
सोलापूर : उजनी धरणातून सध्या भीमा नदीत दहा हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे. तर धरणात दौंडवरून ११ हजार क्युसेक आणि स्थानिक परिसरातून पाच ते सहा हजार क्युसेकची आवक सुरू आहे. आषाढीचा सोहळा ६ जुलैला रंगणार असल्याने चंद्रभागेच्या वाळवंटातील विसर्ग कमी व्हावा, यासाठी उद्या (बुधवारी) दहा हजारांचा विसर्ग पाच हजारांवर केला जाणार आहे.