
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा:उजनी व वीर धरणातून अतिरिक्त पाणी भिमा नदीच्या पात्रात 1 लाख 87 हजार 850 क्युसेक सोडल्याने तालुक्यातील नदीकाठच्या गावाला पुराचा तडाका बसला. यामध्ये नदीकाठची हातातोंडाशी आलेली पिके सध्या पाण्यात गेल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत आणखीनच भर पडली.