30 ऑक्‍टोबरला पंढरपुरात मंत्र्यांची मांदियाळी!पालखीमार्गाचे भूमिपूजन

30 ऑक्‍टोबरला पंढरपुरात मंत्र्यांची मांदियाळी! गडकरींच्या उपस्थितीत पालखीमार्गाचे भूमिपूजन
30 ऑक्‍टोबरला पंढरपुरात मंत्र्यांची मांदियाळी!
30 ऑक्‍टोबरला पंढरपुरात मंत्र्यांची मांदियाळी!Sakal
Summary

पंढरपूर ते आळंदी या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व देहू ते पंढरपूर या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन येत्या 30 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे.

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर (Pandharpur) ते आळंदी (Alandi) या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व देहू ते पंढरपूर या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन येत्या 30 ऑक्‍टोबर रोजी पंढरपुरात सकाळी 11 वाजता होणार आहे. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रमुख उपस्थितीत संत मंडळींच्या हस्ते या राष्ट्रीय पालखी महामार्गाचे भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक (MLA Prashant Paricharak) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. या निमित्ताने ठाकरे (Uddhav Thackeray), गडकरी, फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पवार (Ajit Pawar) हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

दरवर्षी लाखो भाविक पायी आळंदी ते पंढरपूर व देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्यात सहभागी होतात. वारी दरम्यान वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम प्रगतिपथावर आहे. कोरोनामुळे भूमिपूजन कार्यक्रम घेता आला नाही. त्यानंतर आता येत्या 30 ऑक्‍टोबर रोजी पंढरपुरातील रेल्वे मैदानावर भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी दहा हजार लोकांची उपस्थिती राहणार आहे.

30 ऑक्‍टोबरला पंढरपुरात मंत्र्यांची मांदियाळी!
'निवेदिताला 'हा' आशीर्वाद देताना तो मीच असेन हे माहीत असतं तर...'

या कार्यक्रमासाठी राज्यभरातील प्रमुख संत मंडळींना निमंत्रण देण्यात आले असून त्यांच्या हस्ते पालखीमार्गाचे भूमिपूजन केले जाणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी येथे दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे, मंगळवेढा बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, सुभाष मस्के आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com