नाद करा, पण… ; ऑर्केस्ट्राचा नुसता नारळ फोडण्यासाठी ५५ हजारांची बोली, Video बघाच

bid of Rs 55 000 was made to crack a coconut Before starting the orchestra in Solapur watch viral video
bid of Rs 55 000 was made to crack a coconut Before starting the orchestra in Solapur watch viral video

लग्न कार्यात किंवा देवकार्यात बऱ्याचादा लोक मोठ्या प्रमाणात मानपान करताना दिसतात. मात्र माढा तालुक्यात ऑर्केस्ट्राचा नारळ फोडण्यासाठी ५५ हजारांची बोली लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माढा तालुक्यातल्या केवड गावात ऑर्केस्ट्रा सुरू होण्याआधी नारळ फोडण्याचा मान मिळावा यासाठी बोली लावण्यात आली होती. यावेळी चढाओढीने ही बोली वरचेवर चांगलीच वाढत गेली. शेवची एका वृद्ध शेतकऱ्याने चक्क ५५ हजारांची बोली लावत नारळ फोडण्याचा मान पटकवला.

bid of Rs 55 000 was made to crack a coconut Before starting the orchestra in Solapur watch viral video
Ajit Pawar News : साताऱ्यात अजित पवारांचा भाजपला दणका! शेकडो कार्यकर्त्यांसह बडा नेता राष्ट्रवादीत

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये बोली संपतानाचे काही क्षण दिसत आहेत. यामध्ये बोली ५२ हजारांहून ५५ हजारांवर जाताना दिसत आहे. यानंतर गावकऱ्यांचा जल्लोष देखील ऐकायला मिळतोय. गावच्या जत्रेत ऑर्केस्ट्रा सुरू होण्याआधी नारळ फोडण्याचा मान मिळावा यासाठी लागलेल्या या बोलीची सगळीकडे चर्चा होत आहे.

bid of Rs 55 000 was made to crack a coconut Before starting the orchestra in Solapur watch viral video
CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची शरयू नदीकाठी महाआरती; माघारी फिरताना म्हणाले….

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या केवड गावात ही घटना घडली. नारळ फोडणार कोण यासाठी ही बोली लावण्यात आली. भगवान लटके या शेतकऱ्याने यावेळी ५५ हजारांची बोली लावली. फक्त नारळ फोडण्यासाठी ५५ हजार मोजणाऱ्या या शेतकऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com