Ajit Pawar News : साताऱ्यात अजित पवारांचा भाजपला दणका! शेकडो कार्यकर्त्यांसह बडा नेता राष्ट्रवादीत

big blow to bjp in satara bjp leader amit kadam joins ncp ajit pawar satara poliical news
big blow to bjp in satara bjp leader amit kadam joins ncp ajit pawar satara poliical news Sakal

सातारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज(९ एप्रिल) रोजी अयोध्येत पोहचले होता. मुख्यमंत्री-मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. यादरम्यान राष्ट्रवादीने सत्ताधारी भाजपला साताऱ्यात मोठा धक्का दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान भाजपचे नेते अमित कदम यांच्यासह भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला साताऱ्यात मोठं खिंडार पडलं आहे. दरम्यान कदम यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे थेट परिणाम अगामी काळात दिसतील अशी चर्चा सुरू आहे.

big blow to bjp in satara bjp leader amit kadam joins ncp ajit pawar satara poliical news
Sharad Pawar On JPC : शरद पवारांचं लॉजिक योग्य, पण…; JPC बाबतच्या भूमिकेवर शशी थरूर यांची प्रतिक्रिया

अमित कदम यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास ते पूर्वी राष्ट्रवादी पक्षात होते. मात्र 2017 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते राष्ट्रवादीत परत आले आहेत. पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य व शिक्षण व अर्थ समीती सभापतीपदापर्यंत कदम यांनी मजल मारली आहे. आता ते पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा-जावळी मतदारसंघात राष्ट्रवादीकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

big blow to bjp in satara bjp leader amit kadam joins ncp ajit pawar satara poliical news
"बावनकुळे साहेब तुम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष आहात…हे पोस्टर तुम्हाला मान्य आहे का?"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com