women
womensakal

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मोठी मदत! उच्च न्यायालयाने ‘ती’ला २५ आठवड्यांवरील गर्भपातास परवानगी

बाळाचे ह्दय व फुफ्फुस विकसीत होत नसल्याचे समजले. महिलेने सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मदत घेतली. प्राधिकरणाने महिलेची स्थिती पाहून तिला उच्च न्यायालयातून गर्भपातास परवानगी मिळवून दिली. २५ आठवड्याचा गर्भ असल्याने न्यायालयाची परवानगी बंधनकारक होती.

सोलापूर : गर्भवती महिलेचे माहेर पुणे, राहायला पुण्यातच, सातव्या महिन्यात त्यांना गर्भाची वाढ व्यवस्थित नसल्याने गर्भपात करावाच लागेल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आणि पायाखालील वाळूच सरकली. महिलेने सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातून तपासणी केली. त्यावेळी बाळाचे ह्दय व फुफ्फुस विकसीत होत नसल्याचे समजले. चिंतेतील महिलेने सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मदत घेतली. प्राधिकरणाने महिलेची स्थिती पाहून तात्काळ तिला उच्च न्यायालयातून गर्भपातास परवानगी मिळवून दिली. २५ आठवड्यातील गर्भ असल्याने त्यासाठी न्यायालयाची परवानगी बंधनकारक आहे.

दरम्यान, सहा महिने संपल्यानंतर सातव्या महिन्यात गभर्वती महिला तपासणीसाठी पुण्यातील रुग्णालयात गेली. त्यावेळी गर्भातील बाळाची वाढ व्यवस्थित होत नसून गर्भपात करणे योग्य राहील, असा सल्ला डॉक्टरांनी गर्भवतीला दिला. पण, २५ आठवडे पूर्ण झाल्याने विनापरवाना गर्भपात करता येणार नसल्याची चिंता तिला होती. महिलेने सोलापुरातील शासकीय रुग्णालयातून गर्भाची तपासणी केली आणि सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मदत मागितली. प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कागदपत्रे पाहिली.

प्रकरणाचे गांभीर्य पाहून उच्च न्यायालयात गर्भपातास परवानगी मागणीसाठी कागदपत्रे पाठवली. विधी सहाय समितीचे सचिव शैलेश देशपांडे यांनी तात्काळ पावले उचलून ॲड. श्रृती कपाडिया यांची नेमणूक करून त्या महिलेचा अर्ज न्यायमुर्ती गौतम पटेल व नीला गोखले यांच्यासमोर ठेवला. त्यांनी सोलापूरच्या डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील तपासणी अहवाल मागवून घेतला.

अहवाल प्राप्त होताच त्याची पडताळणी करून गर्भपातास परवानगी दिली. त्या महिलेचा नुकताच गर्भपात झाला असून ती सध्या सुरक्षित आहे. यासाठी सहायक विधी सेवा संरक्षण सल्लागार देवयानी किणगी, लिपिक काजल चव्हाण यांनी मदत केली.

गरजू, पिडीत, दुर्बलांचा आधार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरच्या वतीने गरजूंना तात्काळ मदत करीत आहे. गरजू, पीडित, वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना सन्मानपूर्वक सेवा देण्याचे काम प्राधिकरणाकडून सुरू आहे. गरजूंनी निश्चितपणे प्राधिकरणाच्या विधी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांनी केले आहे.

‘ती’च्या चेहऱ्यावर दिसला आनंद

गर्भपती महिलेची शारीरिक स्थिती, गर्भाची वाढ व भविष्यात तिला होणारा धोका, याचे गांभीर्य ओळखून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने तात्काळ मदत केली. विशेष बाब म्हणजे त्या महिलेने आवर्जुन सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची मदत घेतली. तिचा विश्वास सार्थ ठरवून वेळेवर तिला मदत मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला.

- नरेंद्र जोशी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com