
सोलापूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बोगस बियाणे, खते विक्री व लिंकिंग रोखण्यासाठी कृषी विभागाने १२ पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच शेतकऱ्यांची जागृती घडवण्यासाठी कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर क्यूआर कोड लावण्यात येत आहे. शेतकऱ्यांना खतांचे दरपत्रकही कळणार आहे. शिवाय तक्रारी असल्यास शेतकरी त्यावरील व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करू शकतील.