

Government announces doorstep delivery of certified documents, bringing convenience to citizens across the state.
sakal
सोलापूर : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली ‘ई-प्रमाण’ सुविधा यशस्वी ठरली असून, आता पुढील दोन महिन्यांत ती राज्यभर लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे सोलापूरसह संपूर्ण राज्यातील नागरिकांना नोंदणीकृत दस्ताची डिजिटल स्वाक्षरी केलेली प्रमाणित प्रत घरबसल्या ऑनलाइन मिळणार आहे.