
सोलापूर: राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षण विभागांकडील पर्यवेक्षीय यंत्रणेतील महत्त्वाचा दुवा असलेली केंद्र प्रमुख पदाची असंख्य पदे रिक्त आहेत. ग्रामविकास व शालेय शिक्षण विभागाकडून वेळोवेळी काढलेल्या सरकारी सरकारी निर्णय व परिपत्रकांमुळे ही पदे भरण्यामध्ये एकवाक्यता येत नव्हती. परिणामी राज्यभर ही पदे रिक्त राहिली होती. आता दीर्घकाळ रिक्त असलेली केंद्रप्रमुख पदे भरण्यासाठी एकसंध धोरण निश्चित झाल्यामुळे प्राथमिक शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.