मोहोळ : सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर शेटफळजवळ सोमवारी (ता. ५) सकाळी दहाच्या सुमारास कारने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून, पाचजण जखमी झाले आहेत..Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्याहून धावणार ६० नवीन रेल्वे; पुणे स्थानकावर सहा नवीन फलाट; गैरसाेय दूर होणार .मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या भरधाव कारने (एमएच ४६- बीयू ५४०८) मोडनिंबवरून सिद्धेवाडीकडे जात असलेल्या दुचाकीला (एमएच १३- व्ही ६०३९) पाठीमागून जोरदार धडक दिली. यात डोक्याला जबर मार लागून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला, तर कारमधील अन्य पाचजण किरकोळ जखमी झाले. .अपघातात गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वार युवराज बजरंग शिंदे (वय ५५, रा. सिद्धेवाडी, ता. मोहोळ) यांना वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉ. गोरखनाथ लोंढे यांनी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. कारमधील किरकोळ जखमी झालेल्या पाचजणांना शेटफळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर डॉ. सरवदे यांनी उपचार करून त्यांना कळंबोली येथे पाठविले..अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील गस्ती पथक व मोडनिंब महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील कार आणि दुचाकी क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसांत झाली असून, तपास हवालदार चव्हाण करीत आहेत..Dombivli politics: डोंबिवलीत भाजपाची बिनविरोध ‘गेमचेंजर’ खेळी; पॅनल 27 मध्ये मनोज घरत यांनी माघार घेतल्याने महेश पाटील बिनविरोध...कारमधील जखमींची नावेमच्छिंद्र नागनाथ नागरगोजे, सविता वामन खाडे (दोघेही रा. कळंबोली), दक्ष बाळू मगर निर्मला बाळू भगत, देवांश बाळू भगत (तिघेही रा. पनवेल) अशी जखमींची नावे आहेत. मच्छिंद्र नागरगोजे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी पंढरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.