
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील अंदेवाडी ज. येथील बोरी नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतानाही पुलावरील वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून दुचाकीवरून जाताना दुचाकीचालक तरुण वाहून गेला. ही घटना रविवारी (ता. १०) सकाळी दहाच्या सुमारास घडली. घटनास्थळाला तहसीलदार विनायक मगर यांनी भेट दिली.