
Solapur Bird Flu News: सोलापुरात बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रकरणांमुळे चिंता निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजी तलाव आणि किल्ला बाग परिसरात १३ मार्च रोजी २८ कावळे, २ बगळे आणि ४ घारी मृत आढळले. भोपाळ येथील हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज लॅबोरेटरीने केलेल्या तपासणीत याचा ठामपणे बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.