Bird Flu : कोण बंद करणार चिकन शॉप? विजापूर रोडवर आढळले दोन मृत कावळे, प्रशासनांतून टोलवाटोलवी

Solapur Bird Flu : किल्ला बाग व धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसर २१ दिवसांसाठी प्रतिबंधितही केला आहे. या ठिकाणी माणसांचा बिनधास्त वावर असल्याचे आजही दिसले.
Solapur Bird Flu
Solapur Bird Fluesakal
Updated on
Summary

सोलापुरात कावळ्यांचा मृत्यू (Crows Death) वाढत असताना प्रतिबंधात्मक आदेशाच्या अंमलबजावणीसाठी शासकीय विभाग टोलवाटोलवी करताना दिसत आहेत.

सोलापूर : बर्ड फ्लूचा (Bird Flu) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन फक्त कागदी घोडेच नाचवत असल्याचे आजही दिसले. किल्ला बाग व धर्मवीर संभाजी महाराज तलाव परिसरातील चिकन, अंडी व तत्सम पदार्थांची विक्री बंदचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढला. या आदेशाची अंमलबजावणी कोणी करायची? यावरून महापालिका (Solapur Municipal Corporation), पोलिस, अन्न प्रशासन व पशुसंवर्धन विभागात संभ्रम असल्याने या भागातील चिकन विक्री आज खुलेआम सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com