
"मोहोळ भाजपाच्या वतीने भारानियमना विरोधात कंदील अंदोलन"
मोहोळ : मोहोळ तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा मुळे राज्यावर ओढवलेल्या विद्युत भारानियमना विरोधात मोहोळ तहसील कार्यालया समोर रविवार ता 24 रोजी रात्री कंदील आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करून भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण ,शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुशील क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव यांनी महाविकास आघाडी सरकारने चालू केलेल्या भारानियमना विरोधात खरपूस समाचार घेतला, व महाविकास आघाडी सरकारने हा प्रकार थांबवावा व यावर उपाय योजना करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी च्या वतीने या पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला व जाहीर निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते संजय क्षीरसागर, मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, भाजपा मोहोळ शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुशील क्षीरसागर, विधानसभा अध्यक्ष दिलीप गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, तालुका सरचिटणीस सतीश पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्ह्य उपाध्यक्ष नागेश क्षीरसागर, तालुका सरचिटणीस महेश सोवनी, मुजीब मुजावर, औदुंबर वाघमोडे,विशाल डोंगरे, द्रोणा लेंगरे, शहाजहान बागवान, भाउ सारोळकर, सोमनाथ व्यवहारे,महेश सोवनी,अवि पांढरे यांच्या सह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते ,नागरीकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला.
Web Title: Bjp Agitation Load Shedding Power Supply Mohol Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..