

सोलापूर: राज्यात भाजपच्या सहकार्यातून यंदाच्या निवडणुकीत अभद्र युत्या दिसून येत आहेत. सत्तेसाठी भाजपाने तत्त्वे सोडली आहेत. अकोटमध्ये भाजपने एमआयएमबरोबर तर अंबरनाथला भाजप आणि काँग्रेस एकत्रित लढत आहे. पक्ष, विचार याला तिलांजली देऊन सत्ता आणि सत्तेतून मिळणारे टेंडर हे भाजपचे आता समीकरण झाल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.