

Solapur Civic Elections: Massive Deposit Forfeiture Shocks Political Parties
Sakal
सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी १०२ जागांसाठी राष्ट्रीय, राज्य व परराज्य अशा विविध पक्षांच्या चिन्हावर व अपक्ष असे एकूण ५६४ जण रिंगणात होते. त्यातील ३०६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. ही टक्केवारी ५५ इतकी आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या भाजपच्या दोन उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तर सर्वात मोठी वाताहत शहर पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली आहे. १२ उमेदवार रिंगणात होते. निवडून तर एकही आले नाही. याउलट ११ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.