Solapur News: ‘केडर’शी दुरावा; भारतीय जनता पक्षाचा पुन्हा पराभव! नाराज कार्यकर्त्यांची उदासीनता, नोंदणीतच पिछाडी; उमेदवारीच्या निर्णयाचा फटका

Cadre Discontent and Candidate Selection Put BJP Under Pressure: भाजपच्या पराभवामागे नेमकं काय? नाराज कार्यकर्ते, मतदार नोंदणीत पिछाडी अन् उमेदवारीचा पेच
Bharatiya Janata Party Faces Electoral Loss as Disgruntled Cadre Stay Away and Voter Registration Falls Behind Expectations

Bharatiya Janata Party Faces Electoral Loss as Disgruntled Cadre Stay Away and Voter Registration Falls Behind Expectations

sakal

Updated on: 

-अप्पासाहेब हत्ताळे

सोलापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने संघटनात्मक ताकद पणाला लावली. वरिष्ठ नेत्यांचे नियोजन, मंडल अध्यक्षांची यंत्रणा आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदान वाढविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, पक्षाच्या मूळ ‘केडर’शी वाढलेला दुरावा, पक्षातील आयात नेत्यांचे वाढते प्रस्थ, निष्ठावंत इच्छुकांना डावलून बाहेरील उमेदवाराला दिलेली संधी, त्यानंतर पक्षात दिलेला प्रवेश आणि त्यातून निर्माण झालेली नाराजी, यामुळे पदवीधर मतदारसंघात भाजपला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. मतदार नोंदणीपासूनच सुरू झालेली पिछाडी मतदानाच्या दिवशीही भरून काढता आली नाही. याउलट, शिक्षक मतदारसंघात भाजपच्या ‘छुप्या रणनीती’ला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com