MLA Ram Satpute : मंगळवेढ्यातील दुष्काळ हटवण्यासाठी निधी भाजपाने दिला

70 वर्षे काँग्रेसने राज्य करून देखील मंगळवेढ्यातील दुष्काळी भागाला पाणी देऊ शकले नाहीत, म्हैसाळ योजनेला पाणी व निधी भाजप सरकारने दिला.
MLA Ram Satpute
MLA Ram Satputesakal

मंगळवेढा - 70 वर्षे काँग्रेसने राज्य करून देखील मंगळवेढ्यातील दुष्काळी भागाला पाणी देऊ शकले नाहीत, म्हैसाळ योजनेला पाणी व निधी भाजप सरकारने दिला. मंगळवेढा उपसा सिंचन योजना देखील भाजप सरकारच मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर लोकसभेचे उमेदवार आ. राम सातपुते यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी आज पंचवीस गावाचा दौरा केला त्यामध्ये ते भाळवणी येथे बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर, जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, प्रणव परिचारक, दामाजी कारखान्याची संचालक औदुंबर वाडदेकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, अंबादास कुलकर्णी, राजेंद्र सुरवसे, तानाजी कांबळे, मल्लिकार्जुन शिरोळे, सत्यवान कोडग, पोपट आवताडे, धनाजी काटकर आदीसह नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना सातपुते म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात या भागातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून उद्योगधंदे आणण्याऐवजी औद्योगिक वसाहती मधील 118 एकर जमीन जावयाच्या घसात घातली. या भागातील जनतेने पाण्यासाठी बहिष्कार टाकल्यानंतर या बहिष्काराने माझे काय वाकडे झाले का? असे म्हणणाय्राला या निवडणुकीत धडा शिकवण्याची वेळ आली.

या भागातील दुष्काळ हटवण्यासाठी निधी दिला तो भाजप सरकारने त्यामुळे या भागात त्या योजनेचे पाणी येऊ शकले. त्याच पद्धतीने 24 गावाच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला देखील नुकतीच मंजुरी भाजप सरकारने दिल्याने या योजनेची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली.

आ. समाधान आवताडे व मा. आ. प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून या योजनेचे काम पूर्ण येणाऱ्या कालावधीत झाल्यास या भागातील दुष्काळ हटण्यास मदत होणार आहे. मी शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे शेतकऱ्याच्या वेदना काय असतात हे मला माहित आहे. म्हणून या भागाला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदी ला मतदान करा असे आवाहन केले.

भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेद्र मोदीनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या. दुष्काळी जनतेचा कलंक हटण्यासाठी पाणी आंदोलनाची सुरुवात ज्या गावातून झाली त्याच गावाने आता पुन्हा एकदा भाजप सरकारला मतदान करून विश्वास व्यक्त करावा अनेक वर्ष रखडत ठेवलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com