

Solapur Politics BJP Loyalist In Tears Over Candidature Uncertainty
Esakal
भारतीय जनता पक्षात इतर पक्षातील नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी भाजपच्या निष्ठावंत नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्तही केलीय. दरम्यान, आता एका कार्यकर्त्यानं थेट भाजपच्या कार्यालयासमोर पेट्रोल ओतून घेत पेटवून घेईन असा इशारा दिलाय. सोलापूर भाजपचा कार्यकर्ता असलेल्या अंबादास जाधव यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले.