दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजपाच्या मंत्री व पदाधिकाऱ्यांनी येऊ नये - संजय क्षीरसागर

मोहोळ तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता तालुक्याचे ठिकाण हे दक्षिण भागातील शेवटचे गाव असलेल्या घोडेश्वर पासून जवळपास 40 किमी अंतरावर आहे.
bjp ministers office bearers should not attend inauguration of office of the second registrar sanjay kshirsagar
bjp ministers office bearers should not attend inauguration of office of the second registrar sanjay kshirsagarSakal

Mohol News : तालुक्याच्या दक्षिण भागातील कामती बु. येथे अप्पर तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालय या सारख्या कार्यालयाची गेली अनेक वर्षापासून ची मागणी धुडकावून लावत ते इतर ठिकाणी मंजूर करायचे व त्याच्या उद्घाटनाला भाजपच्या महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,

व जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यायचे ही बाब राजकीय दृष्ट्या गंभीर असून तालुक्याच्या दक्षिण भागातील उपेक्षित जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखे होईल अशी खंत भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी व्यक्त केली.त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्धाटनाला भाजपाचे मंत्री व जिल्हाध्यक्ष येणार की नाही याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

येत्या 16 फेब्रुवारी रोजी अनगर ता मोहोळ येथे नव्याने मंजुर झालेले दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होत आहे त्या पाश्वभुमीवर भाजपाचे नेते संजय क्षीरसागर माहीती देत होते.

क्षीरसागर म्हणाले,मोहोळ तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता तालुक्याचे ठिकाण हे दक्षिण भागातील शेवटचे गाव असलेल्या घोडेश्वर पासून जवळपास 40 किमी अंतरावर आहे.त्या भागातील कामती हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने त्या ठिकाणी पोलिस ठाणे ही निर्माण झालेले आहे.

असे असताना त्या भागातील लोकांच्या मागणी प्रमाणे व सोई नुसार त्याच भागात अप्पर तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर होणे गरजेचे असताना तशा आशयाचा मोहोळ तालुका भाजपाचा ठराव दिला असतानाही त्याला केराची टोपली दाखवत, ती मागणी धुडकावून लावली.

त्यामुळे त्या भागातील जनतेच्या मनात नाराजीची भावना असताना, सरकार मधील प्रमुख मंत्री व प्रमुख पक्ष असलेल्या जिल्हाध्यक्ष यांनी त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला यायचे ही बाब समाज मनावर जाणीव पूर्वक आघात करणारी आहे.

सरकार मध्ये प्रमुख तीन पक्ष असताना मोहोळ तालुक्यात फक्त सत्ताधारी आमदार असलेल्या पक्षाला प्राधान्य देऊन निर्णय घ्यायचे ही बाब गंभीर असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकी साठी हे हानिकारक आहे.

अनगर येथे दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर झाले त्याचे उद्घाटन होणार आहे.परंतु दक्षिण भागातील अप्पर तहसील कार्यालय व तिसरे दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर केल्या शिवाय अशी उद्धघाटने करणे राजकीय दृष्टीने गैरसोयीचे आहे. असे स्पष्ट मत संजय क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात जरी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीचे सरकार असले तरी निर्णय लोकहिताचे झाले पाहिजेत .योग्य निर्णयाला पाठिंबा देऊन अयोग्य असेल त्याला प्रसंगी कोणत्याही फायद्या तोट्याचा विचार न करता आंम्ही विरोध केलेला आहे.

युती मधे एकत्र काम करत असताना आमचा कोणालाही व्यक्तिगत विरोध नाही, परंतु सामूहिक लोकहित बाजूला ठेवून सत्तेच्या जोरावर केवळ ठराविक भागाचा विकास होत असेल तर त्या भूमिकेला आमचा विरोध आहे. भविष्यात आणखी अश्या गोष्टी रोखायच्या असतील तर वेळोवेळी आवाज उठवला पाहिजे. यावेळी सतीश पाटील, मुजीब मुजावर उपस्थीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com