पंढरपूर - मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या अनेक आमदार खासदारांनी पाठिंबा दिल्यानंतर आता पंढरपूरचे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनीही जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली आहे.