

Sushma Andhare Attacks BJP, Sparks Political Buzz
Sakal
सोलापूर : भाजपसोबत सत्तेत असलेल्यांचा वापर करून पुन्हा त्यांना फेकून देणे, हीच भाजपची रणनीती आहे. सत्ता आहे म्हणून पक्ष वाढवणे यात काही विशेष नाही. महालातला संसार कोणीही करेल, पण झोपडीचा संसार महालात नेऊन दाखवू, तरच खरी मजा येईल, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि सोलापूर संपर्कप्रमुख सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले. सोलापूरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या राजकारणावर सडकून टीका करत आगामी संघर्षाचे रणशिंग फुंकले.