

Race Heats Up for BJP Nominated Corporator Seat, Moholkar Keeps Close Watch
Sakal
मोहोळ : मोहोळ नगर परिषदेमध्ये सर्वाधिक ११ नगरसेवक निवडून आलेल्या भाजपकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी सुमारे दोन डझन कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करीत हस्ते परहस्ते मागणी केली आहे. तसेच उपनगराध्यक्ष पदासाठीही इच्छुकांनी फिल्डिंग लावल्यामुळे स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदाची लॉटरी नक्की कोणाला लागते? याची चर्चा शहरात सध्या सुरू आहे.