Mangalwedha Zilla Parishad and Panchayat Samiti election result
sakal
मंगळवेढा - 'जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप आ. समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर दुसऱ्यांदा वर्चस्व प्रस्थापित झाले. नगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आ. आवताडे यांनी मोठे संपादन केले.
जिल्हा परिषदेच्या 4 व पंचायत समितीच्या 8 जागांसाठी 7 फेब्रुवारी 65.50% इतके मतदान झाले होते. आज स. 10 वाजता शासकीय गोदाम येथे निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल, सहाय्यक निवडणूक अधिकारी मदन जाधव यांच्या अधिकाराखाली कडक पोलिस बंदोबस्तात मतमोजणी प्रारंभ केला पहिल्यांदा दामाजी नगर गटाची मतमोजणी घेण्यात आली.