esakal | भाजपला मिळणार नाही एकही विषय समिती ! सभागृह नेत्यांबद्दल भाजपमध्येच नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

2congress_ncp_20sena_5.jpg

विषय समित्यांच्या निवडीपूर्वी होईल ताकदीची चाचपणी
राज्यात भाजप- शिवसेनेची सत्ता असल्याने महापालिकेत चार समित्या भाजपकडे तर तीन समित्या शिवसेनेकडे होत्या. परंतु, आता राज्यातील सत्तेची समिकरणे बदलली असून शिवसेनेची भूमिका वेगळी असणार आहे. त्यामुळे पक्षातील आमदार, पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन दोन दिवसांत विषय समित्यासंदर्भात बैठक घेतली जाईल. 
- विजयकुमार देशमुख, आमदार

भाजपला मिळणार नाही एकही विषय समिती ! सभागृह नेत्यांबद्दल भाजपमध्येच नाराजी

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेच्या सहा समित्यांच्या सभापतींच्या निवडी 20 ऑक्‍टोबरला होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी, या समितीच्या सदस्यपदांसाठी महापालिकेतील सर्व गटनेत्यांकडून नावे मागविण्यात आली आहेत. मात्र, शिवसेना- भाजपची सत्ता असल्याने महापालिकेतील चार समित्या भाजपकडे तर तीन समित्या शिवसेनेकडे होत्या. राज्यात आता शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसची महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे विषय समित्या निवडीत एकटे पडलेल्या भाजपने दोन्ही देशमुखांसोबत चर्चा करुन चाचपणी सुरु केली आहे.


महापालिकेत भाजपचे 49, शिवसेनेचे 21, एमआयएमचे नऊ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, वंचित बहूजन आघाडीचे तीन, कॉंग्रेसचे 14 आणि माकपचे एक सदस्य आहेत. विषय समित्यांच्या निवडीत भाजप एकाकी पडेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे विषय समित्यांच्या निवडीसाठी आता 15 दिवस शिल्लक असतानाही अद्याप आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेतलेली नाही. दुसरीकडे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली आता विरोधकांनी सुरु केल्या आहेत. त्यात एमआयएने महिला व बालकल्याण, स्थापत्य या दोन्ही समित्यांवर दावा केला आहे. गटनेते रियाज खरादी यांनी महाविकास आघाडीला साथ देण्याचा विचार बोलून दाखविला आहे. मात्र, तत्पूर्वी, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एमआयएम, वंचित बहूजन आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल. तत्पूर्वी, एमआयएमसह अन्य पक्षांनी महिला व बालकल्याण समितीची मागणी केल्याने निर्माण झालेला पेच आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे, राष्ट्रवादीचे नेते कसा सोडविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


विषय समित्यांच्या निवडीपूर्वी होईल ताकदीची चाचपणी
राज्यात भाजप- शिवसेनेची सत्ता असल्याने महापालिकेत चार समित्या भाजपकडे तर तीन समित्या शिवसेनेकडे होत्या. परंतु, आता राज्यातील सत्तेची समिकरणे बदलली असून शिवसेनेची भूमिका वेगळी असणार आहे. त्यामुळे पक्षातील आमदार, पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन दोन दिवसांत विषय समित्यासंदर्भात बैठक घेतली जाईल. 
- विजयकुमार देशमुख, आमदार


भाजपमध्ये सभागृह नेत्यांविरुध्द नाराजी
महापालिकेच्या सभागृह नेते पदी श्रीनिवास करली यांची निवड होऊन आता वर्ष संपत आले आहे. सभागृहात सभागृह नेता म्हणून करली यांनी त्यांच्या कामाची झलक दाखविलेली नाही. महापालिकेत सत्ता असतानाही विरोधकांचीच चलती अधिक पहायला मिळते. या पार्श्‍वभूमीवर सभागृहनेता बदलावी, अशी मागणी पक्षातील नगरसेवकांनी केली आहे. करली यांनाही बदलण्याची तयारी पक्षातर्फे करण्यात आली असून त्यावरही विषय समित्यांच्या निवडीनिमित्त आयोजित बैठकीत चर्चा केली जाणार आहे. मात्र, कोरोनामुळे मला काम करण्याची संधी कमी मिळाल्याने मला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती करली यांनी पक्षाकडे केल्याचे पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत हा विषय गेला असून त्यावर 20 ऑक्‍टोबरपर्यंत निर्णय होणार आहे.