

Jaykumar Gore Confident of BJP Victory Across Solapur City
Sakal
सोलापूर: सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सातमधील भाजप उमेदवार तर मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहेतच. या शिवाय संपूर्ण सोलापूर शहरातील भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक सातमध्ये आज हजारोंच्या सहभागात पदयात्रा झाली. त्यावेळी ते बोलत होते.