
सोलापूर: भारतीय जनता पक्ष हा ‘केडर बेस्ड’ राजकीय पक्ष. त्यामुळे कार्यकर्ता हा पक्षाची ताकद. मधली अडीच वर्षे वगळली तर साडेसात वर्षांपासून भाजप राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे पक्षासह सरकारकडून ‘बळ’ मिळावे, ही पदाधिकारी - कार्यकर्त्यांची अपेक्षा साहजिक आहे. मात्र, म्हणतात ना सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तशीच स्थिती सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या ‘केडर’ची झाली आहे. पदाधिकारी - कार्यकर्त्यांत पक्षाच्या लोकप्रतिनिधी व सरकारविरोधात खदखद आहे.