Notices served for demolition of 70 properties built on bogus permits; civic report submitted to Commissioner.Sakal
सोलापूर
Solapur News: बोगस परवाना; ७० मिळकतदारांना नोटिसा,पंधरा दिवसांत इमारती पाडण्याच्या सूचना, अहवाल आयुक्तांकडे
Fake Building Permissions Uncovered: सोलापूर महापालिकेत ९६ बोगस बांधकाम परवान्याची प्रकरणे समोर आली. ज्यात परवाना कमी क्षेत्राचे आणि बांधकाम अनधिकृत, चुकीच्या पद्धतीने बांधकाम परवानगी, ऑनलाईन प्रक्रिया असताना ऑफलाईन परवानगी दिली गेली.
सोलापूर: बोगस बांधकाम परवाना प्रकरणातील ९६ मिळकतींपैकी ७० मिळकती नियमित करता येत नसल्याचा अहवाल महापालिका प्रशासनाने दिला आहे. त्या अहवालानुसार संबंधित मिळकतदाराला फ्रंटमार्जिनमधील बांधकाम स्वत:हून काढून घेण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.