

Solapur Crime
सोलापूर : घरातील सगळेजण वरच्या मजल्यावर झोपायला गेले. त्यावेळी चोरट्याने त्या घराला बाहेरून कडी लावली व खालच्या मजल्यावरील कडी तोडून घरातील दोन लाख दोन हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी सतीश शिवप्पा सोलापुरे (रा. कित्तुर चन्नम्मा नगर, विजयपूर रोड) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली.