

₹500 Crore Boramani Airport Preferred Over ₹1,800 Crore Hotgi Upgrade
sakal
सोलापूर: होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यासाठी तब्बल १,८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असताना, त्याच्या केवळ सुमारे २५ टक्के खर्चात बोरामणी येथील प्रस्तावित विमानतळ विकसित करून नाईट लँडिंगसह नियमित विमानसेवा सुरू करणे शक्य असल्याचे चित्र पुढे आले आहे. या मोठ्या आर्थिक तफावतीमुळे राज्य शासनाने बोरामणी विमानतळाचा पर्याय पुन्हा गांभीर्याने हाती घेतला असून, या प्रकल्पातील प्रमुख अडथळा ठरलेल्या माळढोकच्या अस्तित्वाबाबत फेरसर्व्हे करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकीय फायद्या-तोट्याचा विचार केला गेल्याने बोरामणी विमानतळाकडे इतकी वर्षे दुर्लक्ष झाले होते.