

Solapur Boramani Airport Project Faces Forest Clearance Hurdle as MIDC Seeks 1700 Acres of Acquired Land for Industry Use
esakal
सोलापूर : दक्षिण सोलापुरातील बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय झाल्यापासून १८ वर्षांत जमीन हस्तांतरणाशिवाय काहीच झाले नाही. विमानतळाच्या धावपट्टीतच माळढोक अधिवासाची जमीन येत असल्याने केंद्राच्या वन विभागाने ३३.७२ हेक्टरच्या निर्वनीकरणाचा प्रस्ताव पाच वर्षांपूर्वीच फेटाळला. त्यानंतरही काही हालचाली झाल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर विमानतळासाठी संपादित केलेली १७०० एकर जागा उद्योग विभागाने ‘एमआयडीसी’साठी मागितली आहे. तत्पूर्वी, सोलापूरच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडून सद्य:स्थितीचा स्वयंस्पष्ट अहवाल मागितला आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सद्य:स्थितीची माहिती (अभिप्राय) मागितली आहे.