Solapur : सीमा सुरक्षा दल केंद्रांना मिळेना मुहूर्त

सीमा सुरक्षा दल केंद्रासाठी टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) व सशस्त्र सीमा बलाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी हन्नुर (ता. अक्कलकोट) येथील १५१ एकर जागा नऊ वर्षांपासून पडून आहे. तर कोट्यवधी रूपये खर्चून टाकळीत उभारलेल्या इमारतींसह अन्य सुविधा विनावापर धूळखात आहेत.
center
centersakal
Updated on

सीमा सुरक्षा दल केंद्रासाठी टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) व सशस्त्र सीमा बलाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी हन्नुर (ता. अक्कलकोट) येथील १५१ एकर जागा नऊ वर्षांपासून पडून आहे. तर कोट्यवधी रूपये खर्चून टाकळीत उभारलेल्या इमारतींसह अन्य सुविधा विनावापर धूळखात आहेत. त्यामुळे दोन्ही ठिकाणचे केंद्र सुरू व्हावे अन्यथा अन्य सरकारी उपक्रमांसाठी देण्याची मागणी पुढे येत आहे.

तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हे दोन्ही केंद्र सोलापूरसाठी आणले. टाकळीत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची छावणी, कार्यालय, मेस, शाळा, निवासस्थाने यासाठी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. सुरुवातीच्या काळात येथे जवानांची, वाहनांची रेलचेल होती. त्यामुळे परिसरातील अर्थकारण बदलण्याचे चित्र होते. मात्र, आता तेथे केवळ फक्त एक अधिकारी, चार कर्मचारी आहेत. तर हन्नुरमध्ये केवळ जमिनीचे भूसंपादन झाले आहे. तेथे भूमिपूजनाचा शिलान्यास उभा असून सहा जवान तैनात आहेत.

या केंद्रांमुळे अर्थकारण बदलेल, अशी टाकळी, हन्नुरच्या परिसरातील लोकांत आशा होती. मात्र, त्यांच्या पदरी निराशा आली. दोन्ही केंद्र तातडीने सुरू करावेत. ते शक्य नसल्यास इतर उपक्रमाकडे जागेसह सुविधा वर्ग कराव्यात, अशी मागणी होत आहे.

center
Solapur News : सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर फेडरेशनसाठी १०९ उमेदवारी अर्ज दाखल

'...तर निधीचा होईल विनियोग

टाकळी व हन्नुर या दोन्ही ठिकाणी नवोदय अथवा केंद्रीय विद्यालय, केंद्र सरकारचे प्रशिक्षण केंद्र, केंद्र व राज्याच्या राखीव पोलिस दलासाठी सुसज्ज केंद्र उभारता येईल. टाकळी हे सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे. त्यामुळे सुसज्ज रुग्णालय, आयटी पार्कही उभारता येईल.

center
Modi in Solapur : PMआवास योजनेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी तब्बल ३० हजार घरे; १५ हजार घरांची कामे कधीपर्यंत पूर्ण होणार ?

केंद्रात सत्ताबदलानंतर टाकळी, हन्नुर या दोन्ही सुरक्षा दलांच्या केंद्राकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे दोन्ही रखडले आहेत. तेथे ते केंद्र सुरू होणार नसतील तर केंद्राने जागेसह सुविधा अन्य लोककल्याणकारी प्रकल्पांसाठी हस्तांतरित कराव्यात. त्यात केंद्रासह राज्य सरकारच्या प्रकल्पांचा विचार करावा. तसे झाल्यास खर्ची पडलेल्या व गुंतून पडलेल्या गुंतवणुकीचा विनियोग होईल.

-डॉ. चनगोंडा हविनाळे,

माजी सभापती, दक्षिण सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com