
सोलापूर: माळशिरस नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे यांनी रस्त्याच्या कामाचे बिल दिल्याच्या बदल्यात एकूण रकमेतील तीन टक्के रक्कम (एक लाख रुपये) लाच म्हणून मागितली. तक्रारदाराने पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानुसार त्यांच्यावर माळशिरस पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पण, या प्रकरणात माळशिरस न्यायालयाने सबळ व ठोस पुराव्याअभावी डॉ. वडजे यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याची दखल घेण्यास नकार देऊन दोषारोपपत्र लाचलुचपत विभागाकडे परत पाठवून देण्याचे आदेश दिल्याची माहिती ॲड. जोशी यांनी दिली.