esakal | शासकीय मदतीची वाट न पाहता, वाढदिवसावरील खर्च टाळून केली पावसात वाहून गेलेल्या पुलाची दुरुस्ती 
sakal

बोलून बातमी शोधा

Mahud pool

सांगोला तालुका केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नागणे यांनी आपल्या वाढदिवसावर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून यातील स्मशानभूमी जवळील पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांच्या मित्रमंडळींनी पुढाकार घेतला. अरुण नागणे यांनी स्वखर्चातून जेसीबी लावून या पुलाची दुरुस्ती करून घेतली. शासकीय यंत्रणेकडून पुलाची पुढे दुरुस्ती होईल, मात्र सद्य:स्थितीमध्ये शासकीय मदतीची वाट न पाहता त्यांनी स्वखर्चातून या पुलाची दुरुस्ती करवून घेतली आहे. 

शासकीय मदतीची वाट न पाहता, वाढदिवसावरील खर्च टाळून केली पावसात वाहून गेलेल्या पुलाची दुरुस्ती 

sakal_logo
By
उमेश महाजन

महूद (सोलापूर) : सांगोला तालुका केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नागणे यांनी आपल्या वाढदिवसावर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या पुलाची स्वखर्चातून दुरुस्ती केली आहे. यामुळे गेल्या आठवडाभर वाहतुकीसाठी बंद असलेला हा मार्ग नागरिकांसाठी खुला झाला आहे. 

गेल्या आठवड्यात महूद व परिसरात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे कासाळ ओढ्याला पूर आला होता. या पुरात येथील खंडोबा मंदिराजवळील तसेच स्मशानभूमीजवळ असणारा पूल वाहून गेले आहेत. दोन्हीकडील पूल वाहून गेल्याने महीम, लवटेमळा, नागणखोरा या भागातील नागरिकांचा व वाहनधारकांचा महूदशी संपर्क तुटला होता. सुमारे एक आठवड्यापासून येथील वाहतूक पूर्णपणे बंद होती. अजूनही येथून पाणी वाहत असल्याने नागरिकांची ये-जा बंद होती. 

दरम्यान, सांगोला तालुका केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नागणे यांनी वाढदिवसावर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून यातील स्मशानभूमी जवळील पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांच्या मित्रमंडळींनी पुढाकार घेतला. अरुण नागणे यांनी स्वखर्चातून जेसीबी लावून या पुलाची दुरुस्ती करून घेतली. शासकीय यंत्रणेकडून पुलाची पुढे दुरुस्ती होईल, मात्र सद्य:स्थितीमध्ये शासकीय मदतीची वाट न पाहता त्यांनी स्वखर्चातून या पुलाची दुरुस्ती करवून घेतली आहे. या पुलाची दुरुस्ती झाल्याने वाहनधारकांसाठी हा पूल खुला झाला आहे. या वेळी उपसरपंच दिलीप नागणे, माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र नागणे, धनंजय नागणे, धीरज जाधव आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image
go to top