esakal | आमदार भालकेंच्या पाठपुराव्याला १० वर्षाने यश
sakal

बोलून बातमी शोधा

Budget provision for the monument of Saint Chokhomba

मागील सरकारने दलित आणि उपेक्षित असलेल्या चोखोबा आणि महात्मा बसवेश्वराच्या स्मारकाला वारंवार विधानसभेत आवाज उठवून दुर्लक्ष केले.पण या सरकारने या दोन्ही स्मारकासाठी निधीची तरतूद करून न्या दिल्याने माझ्या पाठपुराव्याला यश आले.
- आमदार भारत भालके, पंढरपूर- मंगळवेढा 

आमदार भालकेंच्या पाठपुराव्याला १० वर्षाने यश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : अनेक वर्षापासून निधीच्या प्रतिक्षेत असलेल्या महात्मा बसवेश्वर व संत चोखोबांच्या स्मारकाला अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केली असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांकडून महाविकास आघाडी सरकारबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
१२ व्या शतकात मंगळवेढ्यात वास्तव्य होऊन गेलेल्या संत महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी निधी मिळावा म्हणून आमदार भारत भालकेनी १० वर्षापासून सातत्याने विधानसभेत आवाज उठवला. दरम्यान भाजप सरकारच्या काळात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समितीची स्थापना करण्यात आली. पाच वर्षांमध्ये स्मारक समितीबाबत स्थळ निश्चित व वारंवार बैठका झाल्या. देखभाल दुरूस्ती कोणी करायची यावरून हा प्रस्ताव परत आला. विधानसभा निवडणुकीपूर्वी या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु स्मारकाला मुहुर्त लागला नाही. या रखडलेल्या प्रश्नावरून विधानसभा निवडणूकीत मोठे रणकंदन झाले. शुक्रवारी (ता. ६) अर्थसंकल्पी अधिवेशनात सादर झालेल्या अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली. चोखोबाच्या स्मारकाला निधी मिळावा म्हणून नागरिकांनी चोखोबाच्या समाधीसमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारला. यावेळी सर्वच राजकीय नेत्यांनी चोखोबाच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावतो, असे सुतोवाच दिले. परंतु प्रत्यक्षात मात्र या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावला नाही. परंतु आता या सरकारने या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे या दोन्ही स्मारकाच्या माध्यमातून मंगळवेढा संतांची सृष्टी पाहण्यासाठी पर्यटक वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय त्यांच्या दर्शनासाठी इतर ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांचा ओढा वाढणार आहे. या भागातील तरुण बेरोजगार तरुणांना भविष्यात रोजगार उपलब्ध होणार आहे.

प्रलंबित प्रश्‍नाला न्याय
यापूर्वीच्या जाहीरातबाज सरकारने कामाऐवजी नुसता बोलबाला केला.निधी न दिल्याने तालुक्याचा विकास रखडला.सर्वधर्मसमभावाचा आदर करणाय्रा या सरकारने त्या त्या भागातील भौगोलिक गरजा लक्षात घेवून काम केल्यामुळे तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाला न्याय मिळाला. 
- अनिता नागणे, जिल्हाध्यक्षा, राष्ट्रवादी

पर्यटक वाढतील
दोन्ही स्मारकासाठी निधी मिळाल्याने शहराचा लौकीक वाढणार आहे. यामुळे शहरात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. महामार्गामुळे नवीन पर्यटक देखील वाढणार आहे. निधीची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे आभार. 
- अरूणा माळी, नगराध्यक्षा 

पाठपुराव्याला यश..
मागील सरकारने दलित आणि उपेक्षित असलेल्या चोखोबा आणि महात्मा बसवेश्वराच्या स्मारकाला वारंवार विधानसभेत आवाज उठवून दुर्लक्ष केले.पण या सरकारने या दोन्ही स्मारकासाठी निधीची तरतूद करून न्या दिल्याने माझ्या पाठपुराव्याला यश आले.
- आमदार भारत भालके, पंढरपूर- मंगळवेढा 

नगरपालिकेने प्रमाणपत्र दिले
निधीची तरतूद केल्यामुळे तालुक्यातील पर्यटनवाढीस वाव मिळणार आहे. बसवेश्वर स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीवरून प्रस्ताव परत आला. नगरपालिकेने त्याबाबतचे प्रमाणपत्र तातडीने दिले. चोखोबाच्या स्मारकासाठी शासकीय जागेत अभ्यास केंद्र, सभामंडप, व्यापारी गाळे आदी प्रश्न सामोपचाराने सोडवून दोन्ही स्मारकाचा प्रश्न मार्गी लावावा. 
- अजित जगताप, सदस्य, जिल्हा नियोजन मंडळ

loading image