esakal | अरेच्चा ! उत्पन्नाचे ओझे तिकीट तपासणीसांच्या खांद्यावर 
sakal

बोलून बातमी शोधा

railway

सोलापूर विभागाला एक लाख नऊ हजार कोटींचे उद्दिष्टे 
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या सोलापूर, पुणे, मुंबई, भूसावळ आणि नागपूर विभागाला साडेसात कोटी रुपयांच्या दंड वसुलीचे उद्दिष्टे दिले आहे. 1 ते 10 मार्चपर्यंत होळी या उत्सवानिमित्त प्रवाशांची गर्दी वाढलेली असते. या पार्श्‍वभूमीवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. 
- पंडित गायकवाड, विभागीय मुख्य तिकीट निरीक्षक, सोलापूर 

अरेच्चा ! उत्पन्नाचे ओझे तिकीट तपासणीसांच्या खांद्यावर 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर, नागपूर, पुणे, मुंबई आणि भूसावळ या पाच विभागांना 1 ते 10 मार्चपर्यंत सात कोटी 50 लाखांच्या दंड वसुलीचे टार्गेट रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. सततच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे घटलेली प्रवासी संख्या अन्‌ उत्पन्नात झालेली घट भरुन काढण्यासाठी उत्पन्नाचे ओझे तिकीट तपासणींवर सोपविले जात आहे. 

हेही नक्‍की वाचा : विद्यार्थ्यासांठी खुषखबर ! महाभरतीसाठी आता महाआयटीच्या तज्ज्ञांचे महामंडळ 

सोलापूर विभागासाठी एक हजार 316 तिकीट तपासणीसांची गरज असून सध्या 612 तिकीट तपाणीस कार्यरत आहेत. तरीही वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फुकट्या प्रवाशांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. मागील काही वर्षांपासून सण- उत्सव काळात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून तिकीट तपासणीसांना स्वतंत्र उद्दिष्टे दिले जाते. त्यामुळे तिकीट तपासणीस वैतागले असून 10 मार्चपर्यंत (दहा दिवसांत) एक कोटी 9 लाख रुपये कसे वसूल करायचे, असा प्रश्‍न तिकीट तपासणीसांना भेडसावू लागला आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांना रात्रंदिवस कारवाई करावी लागत आहे. अन्य चार विभागांच्या तुलनेत सोलापूर विभाग दंड वसुलीत आघाडीवर आहे. मात्र, आता उन्हाळा सुट्ट्यांमध्येही पुन्हा उद्दिष्ट दिले जाणार असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. 

हेही नक्‍की वाचा : एक लाख कोटींची गरज ! सिंचन प्रकल्प निधीअभावी कोरडेच 

सोलापूर विभागाला एक लाख नऊ हजार कोटींचे उद्दिष्टे 
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेच्या सोलापूर, पुणे, मुंबई, भूसावळ आणि नागपूर विभागाला साडेसात कोटी रुपयांच्या दंड वसुलीचे उद्दिष्टे दिले आहे. 1 ते 10 मार्चपर्यंत होळी या उत्सवानिमित्त प्रवाशांची गर्दी वाढलेली असते. या पार्श्‍वभूमीवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. 
- पंडित गायकवाड, विभागीय मुख्य तिकीट निरीक्षक, सोलापूर 

हेही नक्‍की वाचा : भाजप खासदार डॉ. महास्वामींच्या याचिकेवर 13 मार्चला सुनावणी 

ठळक बाबी... 

  • 10 मार्चपर्यंत साडेसात कोटींच्या वसुलीचे टार्गेट : सोलापूर विभागाला सव्वाकोटींचे उद्दिष्टे 
  • उन्हाळा सुट्टीत पुन्हा तिकीट तपासणीसांना दिले जाणार 20 कोटींचे टार्गेट 
  • मध्य रेल्वेच्या पाच विभागांमध्ये तिकीट तपासणीसांची चार हजारांहून अधिक पदे रिक्‍त 
  • उद्दिष्टपूर्तीसाठी कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस मेहनत : तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रवाशांत घट 
loading image