esakal | मंगळवेढ्यात सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा
sakal

बोलून बातमी शोधा

मंगळवेढ्यात सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा

सध्या पावसाळ्याचे दिवस विचारात घेता नगरपालिकेच्या बाजार कट्ट्यावर भाजीपाला विक्रेत्यांची व्यवस्था केल्यास विक्रेते सुरक्षित राहून मालाची विक्री करणे शक्‍य होईल. त्यादृष्टीने नगरपालिकेने विचार करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

मंगळवेढ्यात सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता सध्या नगरपालिकेच्या आठवडी बाजारातील शेड रिकामे ठेवून भाजीपाला विक्रेते रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करत आहेत. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. 

विक्रेत्यांसाठी केली शेडची सोय 
शहरातील आठवडा बाजारासाठी लगतच्या गावातील भाजीपाला विक्रेते व शेतकरी आपला उत्पादित माल विक्रीस आणत असल्यामुळे त्यांची गैरसोय लक्षात घेऊन आठवडा बाजाराच्या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने अद्ययावत कट्टे तयार करून निवारा शेडची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे उन्हाळा, पावसाळ्यात बाजारदिवशी विक्रेत्यांना सुरक्षितपणे मालाची विक्री करता येऊ लागली. 

हेही वाचा : दुचाकी अपघातात एक ठार

अन्य ठिकाणी बसण्याची व्यवस्था 
मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने जमावबंदीचा आदेश देऊन आठवडा बाजार बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दर सोमवारी भरणारा आठवडी बाजार गेले तीन महिने बंद होता. परंतु, शहरातील नागरिकांना भाजीपाला उपलब्ध व्हावा म्हणून नगरपालिकेच्या वतीने आठवडा बाजाराच्या निवारा शेडमध्ये विक्रीसाठी न बसवता अन्य ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली. 

हेही वाचा : मोठी ब्रेकिंग..! नागरी बॅंकांवर नाबार्डच्या नियंत्रणाचा प्रस्ताव

सध्या पावसाळ्याचे दिवस 
उघड्यावर रस्त्यालगत बसून भाजीपाला विक्री करताना लगतच्या दुर्गंधीसह सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडत आहे. शिवाय विक्रेत्यांना काही वेळेस पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईस सामोरे जावे लागते. काही वेळेला कारवाईच्या भीतीने पळून जाणाऱ्या विक्रेत्याच्या मागे नगरपालिकेचे कर्मचारी आणि त्यांच्या मागे खरेदी करणारे असे चित्र गल्लीबोळातून पाहावयास मिळाले. सध्या पावसाळ्याचे दिवस विचारात घेता नगरपालिकेच्या बाजार कट्ट्यावर भाजीपाला विक्रेत्यांची व्यवस्था केल्यास विक्रेते सुरक्षित राहून मालाची विक्री करणे शक्‍य होईल. त्यादृष्टीने नगरपालिकेने विचार करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

बहुतांश विक्रेत्यांना सवलत 
कट्टे शिल्लक असताना विक्रेत्यांना रस्त्यावर भाजीपाला विक्रीसाठी बसवून कोरोनाचा धोका भविष्यात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. बाधित नसलेल्या क्षेत्रात बहुतांश विक्रेत्यांना सवलत देण्यात आली. उलट बाजार कट्ट्यावरच सोशल डिस्टन्सिंग ठेवून मालाची विक्री करण्याच्या सूचना पालिकेने देणे आवश्‍यक आहे. 
- दिलीप जाधव, 
जिल्हा सरचिटणीस, कॉंग्रेस 

व्यवसाय महत्त्वाचा वाटतो 
विक्रेत्यांना बसून विक्री करण्याची परवानगी नाही. गर्दीच्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी गेल्यास तेवढ्यापुरते पालन होते. इतर वेळी मात्र पालन होत नाही. त्यामुळे विक्रेत्यांना कोरोनाच्या नियमाचे पालन करण्याऐवजी त्यांना व्यवसाय महत्त्वाचा वाटतो. 
- पल्लवी पाटील, 
मुख्याधिकारी, मंगळवेढा 

जागा उपलब्ध करून देऊ 
पंढरपूर रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासनाने घालून दिलेल्या नियमात बसून भाजीपाला विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यास तयार आहोत. त्यासाठी सभापती सोमनाथ अवताडे देखील आग्रही आहेत. 
- सचिन देशमुख, 
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती