झोपेच्या गोळ्या, दोरी, चाकूची खरेदी! प्रियकराच्या साथीने पत्नीने पतीचा काढला काटा

खूनाच्या दिवशी त्या दोघांनी झोपेच्या गोळ्या, नायलॉन दोरी व चाकू खरेदी केल्याची बाब समोर आली. सुरवातीला अरूणाने उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. पण, प्रियकराच्या मोबाइलमधील व्हॉटस्‌ॲप चॅटबद्दल तिला सांगताच तिनेही गुन्ह्याची कबुली दिली.
Crime News
Crime Newsesakal

सोलापूर : डोंबरजवळगे (ता. अक्कलकोट) येथील दशरथ नागनाथ नारायणकर हा आपल्या पत्नीसोबत काही वर्षांपूर्वी सोलापुरात राहायला आला होता. त्याच्या पत्नीचे बाबासाहेब जालिंदर बाळशंकर या तरूणासोबत सात-आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पत्नी अरूणाने प्रियकर बाबासाहेब बाळशंकर याच्या मदतीने पती दशरथचा खून करण्याचा प्लॅन तयार केला. बुधवारी (ता. २१) पहाटे तीनच्या सुमारास बाबासाहेबाने दशरथचा घरात शिरून खून केला. पत्नीनेच एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. पण, गुन्हे शाखेच्या तपास पथकाने खूनाची माहिती काढून संशयित आरोपीला काही तासांतच पकडले.

मृत दशरथ व त्याची पत्नी अरूणा आपल्या मुलीसोबत जुना विडी घरकूल परिसरातील केकडे नगरात राहत होते. सुरवातीला आर्थिक व्यवहारातून दशरथचा खून झाल्याचा पोलिसांना संशय होता. पण, पहाटेच्या सुमारास झालेला खून आणि पत्नीच्या जबाबावरून पोलिसांना वेगळचा संशय आला. तत्पूर्वी, पतीच्या खूनाची फिर्याद पत्नी अरूणा नारायणकर हिनेच स्वत: एमआयडीसी पोलिसांत दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भेट दिल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या बाजूंनी तपास सुरु केला. आजूबाजूला चौकशी केल्यानंतर पोलिसांना घटनेच्या दिवशी बुधवारी सकाळी बाबासाहेब बाळशंकर हा त्याठिकाणी आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याच्या क्रमांकावर कॉल केला, पण त्याचा मोबाइल बंद होता. त्यानंतर संशय अधिक बळावला आणि पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. गुन्हे शाखेचे तीन पथके त्याच्या शोधात होती. सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षिरसागर यांच्या पथकाने बाबासाहेब बाळशंकर याला मुळेगाव क्रॉस रोडवरून रात्री साडेनऊच्या सुमारास ताब्यात घेतले. प्रेमसंबंधातून खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त डॉ. प्रिती टिपरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस नाईक महेश शिंदे, कृष्णात कोळी, राजु मुदगल, कुमार शेळके, निलोफर तांबोळी, प्रकाश गायकवाड, वसीम शेख, प्रवीण शेळकंदे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. दोन्ही संशयित आरोपींना पोलिस न्यायालयात घेऊन जाणार आहेत.

व्हॉटस्ॲप चॅट उघड होताच पत्नीचीही कबुली

पोलिसांनी संशयित आरोपी बाबासाहेब बाळशंकर याच्या मोबाइलची पाहणी केली. त्यावेळी मयताची पत्नी अरूणाने त्याला व्हॉटस्‌ॲपवर केलेल्या मेसेजचा उलगडा झाला. खूनाच्या दिवशी त्या दोघांनी झोपेच्या गोळ्या, नायलॉन दोरी व चाकू खरेदी केल्याची बाब समोर आली. सुरवातीला अरूणाने उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. पण, प्रियकराच्या मोबाइलमधील व्हॉटस्‌ॲप चॅटबद्दल तिला सांगताच तिनेही गुन्ह्याची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com