esakal | ‘सारथी’ नाही तर तुम्ही नवीन पारथी काढा : चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant_Patil.jpg

पाटील म्हणाले, चौकशीला कोण घाबरत नाही. लोकोपयोगी योजना बंद करणे हेच महाविकास आघाडीचा अजेंडा असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. पाटील म्हणाले, एखाद्या प्रकरणात चुका असतील तर त्याची चौकशी. वेळ देऊन त्याचा निर्णय लावावा. त्यात कोणी दोषी आढळले तर त्यावर कारवाई करा. योजना बंद केल्याने लोकांचा प्रक्षोप होईल.

‘सारथी’ नाही तर तुम्ही नवीन पारथी काढा : चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
अशोक मुरुमकर / प्रशांत देशपांडे

सोलापूर : ‘सारथी’मध्ये अनियमीतता असेल तर त्याची चौकशी करा. पण सारथी बंद करुन चालणार नाही.  त्याच्या माध्यमातून मराठा मुलं- मुली विदेशात जाऊ लागली. एमपीएसी व युपीएसीची तयारी करु लागल आहेत. गावागावापर्यंत सारथीमुळे सरकारच्या योजना पोचवायला लागली, अन्‌ ती बंद करायला लागले आहेत. मग तुम्ही सारथी नाही तर नवीन पारथी काढा, असा टोला मारुन जुने बंद करायचे अन्‌ नवीन समोर काही नाही, अशाने महाराष्ट्राचे वाटोळे होईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकात पाटील यांनी केले आहे.
सोलापूरात एका वृत्तवाहीनीशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. पाटील म्हणाले, चौकशीला कोण घाबरत नाही. लोकोपयोगी योजना बंद करणे हेच महाविकास आघाडीचा अजेंडा असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. पाटील म्हणाले, एखाद्या प्रकरणात चुका असतील तर त्याची चौकशी. वेळ देऊन त्याचा निर्णय लावावा. त्यात कोणी दोषी आढळले तर त्यावर कारवाई करा. योजना बंद केल्याने लोकांचा प्रक्षोप होईल. योजना बंद करताना त्याला पर्याय आवश्‍यक आहे. जलयुक्त बंद करताना त्याला काय पर्याय काढला का? असा प्रश्‍न त्यांनी सरकारला केला आहे. पदोन्नतीबाबत बोलताना पाटील म्हणाले, घटनेच्या चौकटीत राहून जे जे करायचे आहे ते ते करा. पिंजार, खाटीक सारख्या लोकांना ओबीसी सवलती मिळतात. आरक्षण हे धर्माच्या आधारावर देता येत नाही, असेही ते म्हणाले. भीमा कोरेगावबाबत बोलताना पाटील म्हणाले, केंद्रीय चौकशी समितीला सरकार का घाबरत आहे. त्यात भाजपचा हात होता की काँग्रेसचा हे चौकशीत समोर येऊ द्या. भाजपचा हात असेल तर भाजपवर कारवाई होईल. काँग्रेसचा हात असेल तर काँग्रेसवर कारवाई होईल, असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले. दंगल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महान नेत्याला शोध लागला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेयांचा त्यात हात आहे.

loading image