जामीनदार, साक्षीदार होणे पडले महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIR
जामीनदार, साक्षीदार होणे पडले महागात

जामीनदार, साक्षीदार होणे पडले महागात

मंगळवेढा - येथील रतनचंद शहा बँकेस गहाणखत करून दिलेल्या जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी कर्जदार, जामीनदार, खरेदीदार, साक्षीदार असलेल्या सरपंच, शिक्षिकेसह, खरेदी विक्रीचे दस्त एजंट सह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली. या प्रकरणाची फिर्याद रतनचंद शहा बँकेचे वसुली अधिकारी अंकुश गंगाधर जाधव रा. नागणेवाडी यांनी दिली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंगासागर बसवेश्वर पाटील व त्याचा मयत भाऊ शैलेश बसवेश्वर पाटील यांनी बँकेकडून 2011साली तीन लाख रुपये कर्ज घेतले. त्यासाठी भाळवणी ता.मंगळवेढा येथील जमीन गट नंबर 7/2 क्षेत्र 8 हेक्टर 13.10 इतकी जमीन देण्यात आली.त्या कर्जाची नोंद फेरफार क्रमांक 1363 अन्वये सातबारावर झाली. तीच नोंद कायम ठेवून फेरफार 1604 नुसार 2014 रोजी 6 लाख रुपये टर्म लोन घेतले. त्यानंतर काही नोंदी कायम ठेवून आणखीन वाढीव रकमेची कर्जे घेतली त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली या कर्जाला शशिकांत मोतीलाल नाझरकर व पांडुरंग शिवाजी पडवळे हे जामीनदार आहेत.

सदर कर्जदाराने बँकेस अंधारात ठेवून या जमिनीतील संजय नाना बिचुकले रा.हाजापूर यांनी खरेदी केली व धनाजी नाना बिचुकले रा. हाजापूर व सिद्धेश्वर कदम रा. गणेशवाडी हे साक्षीदार आहेत त्यांनी बँकेकडे जमीन तारण असताना खरेदी केली व जमीन तारणाची नोंद असताना साक्षीदार म्हणून सही केली त्यानंतर सदर जमीन विजया शिवाजी पाटील रा.खोमनाळ यांनी 1.61 आर. खरेदी केली त्याचे साक्षीदार म्हणून सुरज चंदू सुतार रा. खोमनाळ हे आहेत याशिवाय शैलेश बसवेश्वर पाटील यांचेकडून शिवाजी निवृत्ती पाटील खोमनाळ यांनी 84.05 आर. जमीन खरेदी केली.

साक्षीदार म्हणून सलीम युन्नुस इनामदार रा. नर्मदा पार्क, रोहित रंगनाथ इंगळे रा. खोमनाळ हे आहेत त्यानंतर यांनीच 0.41 आर.इतकी जमीन खरेदी केली. सदर जमिनीवर बँकेचा बोजा माहित असताना देखील भीमराव दगडू शिंदे रा खोमनाळ ईश्वर कुंडलिक शिंदे रा. डोंगरगाव यांनी बेकायदेशीररित्या कागदपत्रे करून जमीन खरेदी विक्रीचे दस्त करण्यास मदत केली व सदर जमिनीच्या विक्री नंतर आलेले पैसे बँक खात्यात भरले नाहीत. त्यामुळे कर्जदाराकडे फेब्रुवारी 2022 अखेर 13 लाख 30 हजार 696 रुपये इतकी रक्कम राहिली. म्हणुन बँकेचे फिर्यादी अंकुश जाधव यांनी कर्जदार गंगासागर बसवेश्वर पाटील व मयत शैलेश बसवेश्वर पाटील हे दोघे रा. भाळवणी, जामीनदार शशिकांत मोतीलाल नाझरकर, पांडुरंग शिवाजी पडवळे, खरेदीदार संजय नाना बिचुकले रा. हाजापूर, शिवाजी निवृत्ती पाटील, विजया शिवाजी पाटील रा. खोमनाळ, साक्षीदार धनाजी नाना बिचुकले रा. हाजापूर सिद्धेश्वर शंकर कदम रा. गणेशवाडी, सुरज चंदू सुतार, रोहित रंगनाथ इंगळे हे दोघे रा. खोमनाळ, सलीम युन्नुस इनामदार रा. नर्मदा पार्क, दस्त करणारे भीमराव दगडू शिंदे, रा. खोमनाळ, ईश्वर कुंडलिक शिंदे रा. डोंगरगाव या 14 जणांविरोधात बँकेने बँक बोजा असताना तशा प्रकारच्या नोंदी फेरफारवर असताना देखील, गहाणखत केलेल्या जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी कर्जदार,जामीनदार, खरेदीदार,साक्षीदारसह खरेदी विक्री करणाऱ्या एजंटाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास स पो.नि. बापूसाहेब पिंगळे करीत आहे.

Web Title: Case Registered Against Debtors Bailiffs Buyers Witnesses Purchase And Sale Agents With 14 Persons

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top