

Monthly Protection Money Demand Leads to FIR Against Accused
sakal
सोलापूर : शिवभोजन केंद्राचा फोटो काढून नितीन कांबळे (रा. सदर बझार) याने अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याने दरमहा हप्ता घेतला. आता रक्कम वाढवून मागत असून, त्याने २० हजारांची खंडणी मागितल्याची फिर्याद इरफान युन्नुस शेख (रा. भवानी पेठ, सोलापूर) यांनी या प्रकरणी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून नितीन कांबळेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.