

दिवाळी म्हणजे दीपोत्सवाचा सण आहे. सणासुदीचा हंगाम सुरू झाला असून सोलापूर शहरातील बाजारपेठ सजल्या आहेत. शहरातील टिळक चौक, अशोक चौक, सुपर मार्केट रंगीबेरंगी दिव्यांनी गजबजलेला आहे. यंदा पाण्यावर पेटणारा दिवा हा ग्राहकांची पसंती बनत आहे. या दिव्यात पाणी टाकले की लाईट सुरू होते.