
सोलापूर : सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी सध्या जात प्रमाणपत्रामुळे चर्चेत आले आहेत. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघातून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. खासदारांकडे अनुसूचित जातीचे (एससी) तर त्यांच्या पुतण्याकडे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र असल्याने समोर आले आहे.
हेही वाचा - धक्कादायक! का गेली लालपरी आगीच्या खाईत?
खासदार महास्वामी यांच्याकडे असलेले अनुसूचित जातीचे बेडा जंगमचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा निष्कर्ष सोलापूरच्या जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने काढला आहे. खासदारांचे पुतणे योगेश्वर सिद्धमलय्या हिरेमठ यांच्याकडे हिंदू जंगमचे (इतर मागास प्रवर्ग) प्रमाणपत्र असून या प्रमाणपत्राच्या आधारे खासदारांच्या पुतण्याने लाभ घेतला आहे. पुतण्याच्या या प्रमाणपत्राबाबतही आता खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना खुलासा करावा लागणार आहे. भीमाशंकर महादेव वाघमोडे, हणमंत गुरुलिंगप्पा पाटील, नागप्पा सिद्रामप्पा पाटील, बसण्णा लिंगप्पा माशाळे, धोंडू खुबा राठोड, शिवकुमार शिवशंकर ढगे यांनी दक्षता पथकासमोर दिलेले जबाब वस्तुस्थितीला नसून या जबाबाबद्दलही खासदार महास्वामींना समितीसमोर खुलासा करावा लागणार आहे.
हेही वाचा - बापरे...इतक्या लाखांचे धनादेश "बाऊन्स'
खासदार महास्वामींचे भाऊ, बहीण, चुलते, आत्या व आजोबा अथवा त्यांच्या रक्त नात्यातील नातेवाइकांचे बेडा जंगम जातीबद्दल समितीकडे पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. खासदार महास्वामी यांच्याकडे असलेले बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र रद्द का करू नये? या बाबत समितीने खासदार महास्वामींना नोटीस बजावली आहे. या नोटीसवर सोमवारी (ता. 27) सकाळी 11.30 वाजता सुनावणीसाठी बोलविण्यात आले आहे.
2019 मध्ये झाली होती तिरंगी लढत
2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघात तिरंगी लढत झाली होती. कॉंग्रेसच्यावतीने माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ऍड. प्रकाश आंबेडकर आणि भाजपच्यावतीने डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत खासदार महास्वामी यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी विजय झाला होता. कॉंग्रेसच्या शिंदे यांना दुसऱ्या क्रमांकाची तर आंबेडकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.