
सोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे यांच्या पॅनेलमध्ये झालेली लढत, शहराध्यक्षपदासाठी रोहिणी तडवळकर यांच्या नियुक्तीने ज्येष्ठ अन् इच्छुकांच्या मनावर झालेल्या जखमा या दोन घटनांनी सोलापुरातील भाजप सध्या अस्वस्थ आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजचा पूर्ण दिवस सोलापूरसाठी दिला. सोलापुरातील भाजपचा कानोसा घेत घेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आज रंजिता चाकोते यांनी केलेला आमरस, आमदार देवेंद्र कोठेंचा नाश्ता आणि जाता जाता आमदार सुभाष देशमुखांच्या घरी जाऊन चहा पचविला, हे विशेष.