
पंढरपूर: उजनी धरणातून सोमवारी (ता. २८) सायंकाळी चार वाजल्यापासून भीमा नदीत ७१ हजार ६०० क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला. तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये सकाळी दहापासून ३२ हजार ६६३ इतका विसर्ग सुरू आहे. नीरेचे पाणी माळशिरस तालुक्यातील संगम येथून पुढे भीमा नदीत येते. त्यामुळे भीमेकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर पंढरपुरात चंद्रभागेने सायंकाळी इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.