

Maharashtra Rain Update Chandrabhaga River Swells in Pandharpur Eight Barrages and Stone Bridge Under Water
sakal
पंढरपूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात जवळपास ६१ हजार इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी मंगळवारी (ता. २८) पंढरपुरात पोचल्याने चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने भाविकांना नदीपात्रात जाण्यास मनाई केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व घाटांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.