esakal | चंद्रकांत दादा म्हणाले...शिवसेनेने हिंमत असेल तर एकटे लढावे (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakan patil

पक्षात एकनाथ खडसे व पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा आहेत, असे पत्रकारांनी विचारले असता श्री. पाटील म्हणाले, कोणीही पक्षात नाराज नाहीत. ते आमच्या घरातच आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार का? याबाबत विचारले असता ते राज्यातच प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका लावून धरतील असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

चंद्रकांत दादा म्हणाले...शिवसेनेने हिंमत असेल तर एकटे लढावे (Video)

sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः राज्यातील सरकार हे तकलादू सरकार आहे. या सरकारला पाडण्यासाठी वेळ व पैसा खर्च करणार नाही. ते सरकार आपोआप पडेल. भविष्यात आम्ही एकट्याने लढण्यास तयार आहोत. पण, शिवसेनेमध्ये हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने लढावे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे. 


हेही वाचा ः अर्रर्र...रस्त्यावरच अडकला गॅसचा टॅंकर 
एका खासगी कार्यक्रमानिमित्त श्री. पाटील आज सोलापुरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. श्री. पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बोलताना म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्व स्वीकारले आहे. आम्हीही हिंदुत्ववादी आहोत. पण, मनसेने त्यांची परप्रांतियांविषयीची असलेली भूमिका बदलणे गरजेचे आहे. जोपर्यंत ते त्यांची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत भाजपच्या झालेल्या पराभवाबद्दल बोलताना श्री. पाटील म्हणाले, मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत भाजपची स्थिती सुधारली आहे. जागांमध्ये वाढ झाली आहे. एकूण मतांची टक्केवारीही वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्लीत कॉंग्रेसच्या जवळपास 63 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यामुळे दिल्लीत कॉंग्रेस पूर्णपणे "सरेंडर' झाल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले. 


हेही वाचा ः कारखानदारांना राज्य बॅंकेने भरला दम... 

श्री. पाटील म्हणाले, दिल्लीतील पराभवाबद्दल राज्यातील नेते खूप मोठ्या बढाया मारत आहेत. पण, मुलगा दुसऱ्याच्या घरी जन्माला आला आहे आणि राज्यातील हे नेते मात्र पेढे वाटत सुटले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता श्री. पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. दिल्लीत शिवसेना व राष्ट्रवादीला तर शून्य टक्‍यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. पण, दुसऱ्याच्या घरी मुलगा झाल्याने पेढे वाटायचे काम ते करत आहेत तर त्यांना ते खुशाल करू द्या, असेही श्री. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. श्री. पाटील म्हणाले, 16 फेब्रुवारीला नवी मुंबईमध्ये भाजपचे अधिवेशन आहे. त्या अधिवेशनामध्ये पक्षाचा नवीन प्रदेशाध्यक्ष जाहीर केला जाणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला कोअर कमिटीची बैठक घेऊन त्यावर प्रदेशाध्यक्षपदाच्या नावावर चर्चा केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या अधिवेशनामध्ये नव्या अध्यक्षांच्या निवडीसोबतच राज्यात सुरू असलेल्या महिलांवरील अत्याचाराविषयी चर्चा केली जाणार आहे. येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळात एक दिवस महिलांच्या अत्याचाराविषयी चर्चा करण्यासाठीची वेळ मुख्यमंत्र्यांकडे मागितली जाणार आहे. त्यामध्ये त्या-त्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याविषयी आपली मते मांडतील, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. 

चंद्रकांत दादा पडता पडता वाचले... 
सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये चंद्रकांत पाटील पत्रकारांशी संवाद साधत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीच्या प्रश्‍नाला उत्तर देताना दादांची खुर्ची अचानक मोडली. पण, सुदैवाने दादा त्या खुर्चीवरून जमिनीवर पडता पडता वाचले. शेजारी बसलेल्या माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दादांना आधार दिला. त्यानंतर ती खुर्ची बदलण्यात आली. 


 

loading image