'राज्य शासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांपेक्षा शाहरुखच्या मुलाची चिंता!'

'राज्य शासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांपेक्षा शाहरुख खानच्या मुलाची चिंता!'
चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटीलsakal
Updated on: 
Summary

शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या समस्यांपेक्षा राज्य शासनाला केवळ शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या सुटकेची चिंता सतावत आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केले.

सोलापूर : गेल्या 17 महिन्यांपासून वेतन न झाल्याने राज्यातील 29 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. अतिवृष्टीत 38 लाख हेक्‍टरवरचे पीक तर मराठवाड्यातील जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकरी, कर्मचारी यांच्या समस्यांपेक्षा राज्य शासनाला केवळ शाहरुख खानचा (Shahrukh Khan मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) सुटकेची चिंता सतावत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.

एम्प्लॉयमेंट चौक येथील शांतीसागर मंगल कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील
मुख्य मागणी मान्य केलीच नाही! एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, राज्यात शेतकरी, कर्मचारी, ऊसबिल थकबाकी आदी समस्या सतावत असताना, राज्य शासन केवळ आर्यन प्रकरणात अधिक रस दाखवत आहे. बॉलिवूडच्या प्रत्येक विषयामध्ये राज्य शासनाचा सुरू असलेला हस्तक्षेप पाहता एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला प्रश्‍न पडतो की, राज्यातील सर्व समस्या संपल्या आहेत की काय? केवळ आर्यन प्रकरण तेवढेच महत्त्वाचा विषय आहे का, असाही सवाल त्यांनी केला.

महाआघाडी सरकारमधील गृहमंत्री फरार, एका मंत्र्यावर दोन महिलांचे आरोप, तिसऱ्या मंत्र्याने जावयाला 1500 कोटींचा मक्ता दिला. राज्याचा कारभार नेमके कोणत्या दिशेने चालले आहे? असा सवाल उपस्थित करत, महाआघाडीतच एकी नाही, शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे हे सरकार असल्याचे म्हणत शासनाच्या कारभारावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.

बातमीदार : प्रमिला चोरगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Drought Relief 2026 Farmers May Get Compensation Before Diwali Check Required Documents and Application Details
Shardiya Navratri Begins in Maharashtra with Ghatasthapana at Tuljapur Mahur Kolhapur and Saptashrungi Temple
Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
Marathi News Esakal
www.esakal.com