शिवजयंतीनिमित्त सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल! १८ व १९ फेब्रुवारीला ‘या’ पर्यायी मार्गाने करा प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cp rajendra mane
शिवजयंतीनिमित्त सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल! १८ व १९ फेब्रुवारीला ‘या’ पर्यायी मार्गाने करा प्रवास

शिवजयंतीनिमित्त सोलापुरातील वाहतूक मार्गात बदल! १८ व १९ फेब्रुवारीला ‘या’ पर्यायी मार्गाने करा प्रवास

सोलापूर : शहरात १५ ते १९ फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली जाते. १८ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवजन्मोत्सव पाळणा कार्यक्रम होणार आहे. तर १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल केला जाणार असून त्यासंबंधीचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सोमवारी काढले.

शिवजयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी (ता. १८) सायंकाळी सहा ते गुरुवारी (ता. १९) पहाटे एक वाजेपर्यंत शिवजन्मोत्सव पाळणा कार्यक्रम होणार आहे. त्या दिवशी श्री छत्रपती संभाजीराजे चौक (जुना पूना नाका) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, सम्राट चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, निराळे वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, तरटी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या मार्गावरील वाहनांसाठी जुना पूना नाका ते अॅम्बेसिडर हॉटेलजवळून निराळे वस्तीमार्गे कल्पना कॉर्नर तर सम्राट चौक-बाळीवेसमार्गे टिळक चौक ते पुढे आणि निराळे वस्ती ते कल्पना कॉर्नरमार्गे पुढे मेकॅनिक चौक ते कल्पना कॉर्नरमार्गे पुढे अशी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

मिरवणुकीमुळे १९ फेब्रुवारीला पर्यायी मार्ग

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने १९ फेब्रुवारीला शहरातून भव्य मिरवणूक निघणार आहे. या पार्श्वभूमीवर डाळिंबी आड येथून शिंदे चौक, सरस्वती बुक डेपो, नवी पेठ, पारस इस्टेट, मेकॅनिक चौक, पांजरपोळ चौक, तरटी नाका पोलिस चौकी, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, कसबा चौक, खाटीक मशीद, दत्त चौक, राजवाडे चौक, जुने विठ्ठल मंदिर, चौपाड ते डाळिंबी आड हा मार्ग त्या दिवशी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

या मार्गावरील वाहनधारकांसाठी सात रस्ता, मोदी पोलिस चौकी, रेल्वे स्टेशन, भैया चौक, कल्पना कॉर्नर, निराळे वस्ती, अॅम्बेसिडर हॉटेलजवळून एसटी स्टॅण्ड किंवा जुना पूना नाका असा पर्यायी मार्ग असेल. तसेच सात रस्ता, रंगभवन चौक, सिव्हिल चौक, पोटफाडी चौक, व्हिको प्रोसेस, शांती चौक, जुना बोरामणी नाका, मड्डी वस्ती, जुना तुळजापूर नाकामार्गे पुढे जुना पूना नाका, हाही पर्यायी मार्ग वापरता येईल.