
वैराग : तणनाशक वापरून बांध फवारल्यामुळे एका शेतकऱ्याची द्राक्ष बाग जळून गेली. ही घटना २८ जून रोजी बार्शी तालुक्यातील तडवळे येथे घडली. यात द्राक्ष बागेचे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात बाळासाहेब जाधव (रा. तडवळे) यांच्या फिर्यादी वरून पांडुरंग पवार याच्या विरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.